कन्नड घाटातील म्हसोबा मंदिराची पुनर्स्थापना
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२१ । कन्नड घाटातील म्हसोबा मंदिराची स्थलांतरित केल्यानंतर रस्ता मोकळा झाला आहे. कंत्राटदार राज पुन्शी यांनी विधीवत पूजा करून मंदिराची दुसऱ्या ठिकाणी स्थापना केली. आता मंदिराच्या शेडचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीस निर्माण होणारा अडथळा आता दूर होणार आहे.
बुधवारी सकाळपासून घाटातील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुक कोंडीची समस्या दूर झाल्याने दुरूस्तीच्या कामाला गती मिळाली आहे. सध्या दोन ठिकाणी संरक्षण भिंत उभारली जात आहे. ते काम सात ते आठ दिवसात पूर्ण होईल. तर सांगवी फाटा व यू टर्नपर्यंत डांबरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. यू टर्नपासून ते वरच्या टप्यावरील डांबरीकरणाचे कामही तीन चार दिवसात पूर्ण होईल,
गुरूवारी सुरक्षीत वाहतुकीच्या दृष्टीने घाटातील म्हसोबा मंदिर सन्मानपूर्वक पुर्नस्थापित केले आहे. म्हसोबा मंदिर भागात रस्ता अरूंद असल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी निर्माण होते.
त्यामुळे ती कोंडी दूर करण्यासाठी म्हसोबा मंदिराचे पावित्र्य राखत ते स्थलांतरीत केले. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी याबाबत महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना पत्र पाठवले होते.