---Advertisement---
कृषी जळगाव जिल्हा

शेतकऱ्यांना शाश्वत जीवनाकडे नेण्याचा ८५ गावांतील १७० शेतकरी मित्रांचा संकल्प

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि आताच्या काळात त्याला जगवण्याची आणि त्याच्यात आशावाद निर्माण करण्याची नितांत गरज आहे असे वक्तव्य प्रतिपादित करत जळगाव जिल्हाधिकरी मा. अभिजित राऊत यांनी भरारी फाउंडेशन संचलित शेतकरी संवेदना अभियान अंतर्गत एकदिवसीय शेतकरी मित्र कार्यशाळेचे उदघाटन केले. गेल्या ८ वर्षांपासून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची जबाबदारी घेऊन विधवा महिलांना रोजगार देणे तसेच त्यांच्या पाल्यांची शैक्षणिक जबाबदारी घेऊन त्यांचे भविष्य उज्वल करण्याची मोहीम भरारी फाऊंडेशन तर्फे राबविली जात आहे. पण आता शेतकऱ्यांनी आत्महत्याच करू नये यासाठीदेखील भरारी फाऊंडेशनने ठोस पाऊल उचलले आहे.

resolution of 170 farmer friends from 85 villages

पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त पारोळा तालुक्याला लक्ष्य करण्यात आले आहे. सुमारे 85 गावातील 170 शेतकरी मित्रांची कार्यशाळा अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आयोजित करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी मा.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा कृषि अधिक्षक संभाजी ठाकुर, भालचंद्र पाटील, भरतदादा अमळकर, अमर कुकरेजा, अनिल भोकरे, छत्रपती वानखेडे, मिलिंद आरोलकर, रविजी लढ्ढा, नंदलाल गादिया, रमेशजी मुनोत, भालचंद्र पाटील, कुशल गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.

---Advertisement---

निवड झालेल्या शेतकरी मित्रांमार्फत गावातील आर्थिक आणि नैराश्यने ग्रासलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोचून त्यांना आत्महत्येच्या विचारांपासून दूर करणे हे भरारीच्या शेतकरी संवेदना अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजना पोचविणे, त्यांचे समुपदेशन करणे, त्यांना इतर आदर्शवत शेतकऱ्यांची उदाहरणे देऊन त्यांच्यात आशावाद निर्माण करणे, अशी कार्ये शेतकरी मित्रा मार्फत केली जातील असे भरारी फाऊंडेशनचे संचालक दीपक परदेशी यांनी प्रास्ताविक करताना मांडले. तसेच भरतदादा अमळकर यांनी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ट्रॅक्टर, जेसीबी आणि शेतीची उपकरणे व अवजारे केशव स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्याचे अभिवचन दिले.

सातारा येथून विशेष अतिथी शेतकरी पाणी फाउंडेशन चे सुखदेव भोसले यांनी शेतीतील पाण्याचे महत्त्व तसेच शेतीसाठी पर्यावरणाची गरज यावर भाष्य करत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत कृषि उपसंचालक अनिल भोकरे, विभागीय बीजोत्पादन अधिकारी उमाकांत पाटील, छत्रपती वानखेडे, मानसोपचार तज्ञ डॉ. कांचन नारखेडे, अध्यात्मिक महाराज दिपक पाटील, शिक्षण क्षेत्रातील जयदीप पाटील या विविध मान्यवरांनी व्याख्याने आणि प्रात्यक्षिके देत मार्गदर्शन केले. त्याच सोबत कृषि भूषण पुरस्कार प्राप्त अनिल सपकाळे व समाधान पाटील या प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपले शेतीविषयक अनुभव व्यक्त केले आणि शेतकरी मित्रांनी प्रतिज्ञा करत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी वचन दिले.

जैन समूहातर्फेदेखील कार्यशाळेसाठी विशेष सहकार्य लाभले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी दिपक परदेशी, विनोद ढगे,सचिन महाजन, मोहित पाटील, अभिषेक बोरसे, दिपक विधाते, अरविंद पाटील, अवधुत दलाल यांनी प्रयत्न केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---