⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | किनगाव बुद्रुकच्या महिला सरपंचांचा राजीनामा ; कारण जाणून घ्या..

किनगाव बुद्रुकच्या महिला सरपंचांचा राजीनामा ; कारण जाणून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२४ । यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील सरपंच निर्मला संजय पाटील यांनी १० जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ग्रामपंचायतीच्या महिला राखीव जागेवर आता भारती पाटील यांना ठरल्याप्रमाणे संधी दिली जाणार आहे.

किनगाव बुद्रुक या ग्रा.पं.च्या महिला राखीव जागेवरून निर्मला संजय पाटील यांची सरपंचपदी निवड झाली होती. त्यांनी तब्बल ३९ महिने सरपंच पदाचा कार्यभार सांभाळून १० जूनला बीडीओंकडे पदाचा राजीनामा सोपवला. माजी आमदार रमेश चौधरी यांच्या उपस्थितीत राजीनामा दिला. पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर सरपंच निवड करताना अडीच वर्षे निर्मला संजय पाटील, त्यानंतर दीड वर्ष भारती प्रशांत पाटील आणि शेवटचे एक वर्ष स्नेहल मिलिंद चौधरी यांना सरपंचपद देण्याचे सर्व सदस्यांनी एकमताने निश्चित केले होते. पण निर्मला पाटील ३९ महिने पदावर राहिल्या. त्यांनी राजीनामा दिल्याने भारती प्रशांत पाटील यांना संधी दिली जाणार आहे.

९ महिने उशिरा राजीनामा
किनगाव बुद्धक ग्रामपंचायतीत माजी आमदार रमेश चौधरी यांच्या नेतृत्वात निवडणूक झाली होती. त्यांनी आपसात तीन महिलांना सरपंच पदाची संधी वाटून दिली होती. अडीच वर्ष झाल्यानंतर आपण राजीनामा देणार होतो. पण, माजी आमदार रमेश चौधरी यांनी सरपंच पदावर काम करत राहा, असे आदेश दिले होते. आता देखील त्यांनी सूचना केल्याने आपण राजीनामा दिला. काही जण उगाच गैरसमज पसरवत असल्याचे सरपंच निर्मला पाटील यांनी सांगीतले

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.