जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२३ ।नागपूर खंडपीठाच्या (Bombay High Court) न्यायमूर्ती रोहित देव (Rohit Dev) यांनी आज (५ऑगस्ट) कोर्टातच तडकाफडकी राजीनामा दिला. यामागील कारण अद्यापही अस्पष्ट असून मात्र अचानक राजीमाना दिण्यामागचे कारण काय? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
सकाळी कोर्ट सुरू झाल्यानंतर न्यायामूर्ती रोहित देव यांनी कोर्टाचे कामकाज पाहिले. सर्वा कामकाज नियमितपणे हाताळल्यानंतर त्यांनी कोर्ट रूममध्येच न्यायामूर्तीपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. आणि काही न बोलता ते कोर्टातून निघून गेले. देव यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.
दरम्यान, न्यायामूर्ती रोहित देव यांनी नक्षलवाद्यांशी संबंध असलेले प्रा. जीएन साईबाबा यांना निर्दोष मुक्त केलं होतं. त्यांच्या या निर्णयानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाचा निर्णय फिरवून साईबाबा यांना दोषी ठरवलं होतं. देव यांच्या राजीनाम्या मागे हेही एक कनेक्शन असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, देव किंवा इतर कुणीही त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण सांगितलेलं नाही