⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

रेल्वे गाड्यांचे आरक्षण आतापासूनच फुल, भुसावळहुन धावणाऱ्या या गाड्यांची तिकिटे प्रतीक्षा यादीत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२४ । दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर अनेक जण कुटुंबासह फिरण्याचा प्लॅन करत असून यामुळे भुसावळविभागातून दिल्ली आणि उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे तिकिटे आतापासूनच बुक झाली आहेत. यामुळे काही गाड्यांचे आरक्षण फुल झाले असून दिल्लीकडे जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेससह इतर गाड्यांची तिकिटे प्रतीक्षा यादीत आहेत. त्यामुळे प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्याची वेळ येणार आहे.

दरवर्षी उन्हाळा म्हटला की अनेक नागरिक पर्यटनासाठी बाहेरगावी जात असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिल्ली, वाराणसी, गुजरात, आग्रा या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रवाशांनी महिनाभरापासून तिकीट काढायला सुरुवात केली आहे. यामुळे बहुतांशी रेल्वे गाड्यांची तिकीट बुकिंग फुल्ल होऊन अनेक प्रवाशांचे तिकीट प्रतीक्षा यादीत आहेत.

प्रतीक्षा यादीत या गाड्यांचा समावेश
दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर अनेक नागरिक पर्यटनाचे नियोजन करत असल्यामुळे या गाड्यांची तिकिटे आतापासून फुल्ल झाली असल्याचे सांगण्यात आले. यात राजधानी एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस, झेलम एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस, काशी एक्स्प्रेस आदी गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांना सद्य:स्थितीला लग्नसराईमुळे प्रचंड गर्दी आहे.

कोणत्या गाड्याला किती प्रतीक्षा यादी?
भुसावळमार्गे दिल्ली जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसला ५० ते ५५ वेटिंग आहेत. तर पुणे-जम्मू तवी झेलम एक्स्प्रेसला ६० ते ७०, नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेसला ४० ते ४५, अमृतसर पठाणकोट एक्स्प्रेसला ८० ते ९० पर्यंत वेटिंग लिस्ट आहे.

दरम्यान दरवर्षी उन्हाळ्यात फेस्टिव्हल गाड्या सोडण्यात येत असतात. त्यामुळे यंदाही या स्पेशल गाड्या पुढील महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. फेस्टिव्हल गाड्यांमुळे गर्दीचे प्रमाप् कमी होऊन प्रवाशांच्या सोयीचे ठर असते. दरम्यान, या फेस्टिव्हल गाड्य कधी सुरू होणार याची रेल्वे बोर्ड प्रशासनातर्फे माहिती प्राप्त झालं नसल्याचे भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले