जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२६ । गेल्या काही दिवसापासून उत्सुकता लागून असलेल्या महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत अखेर आज गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. महापौरपद कुणासाठी राखीव सुटणार हे पाहण्यासाठी सर्वांची धाकधूक आणि उत्सुकता वाढली होती. आज अखेर यावर शिक्कामोर्तब झालेय.
आज मंत्रालयात महापौरपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यात जळगाव महापालिकेसाठी ओबीसी महिला हे आरक्षण निघाले आहे.

महापालिकांसाठी कुठे कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण?

- 1. नवी मुंबई: सर्वसाधारण
- 2. छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण (महिला)
3. वसई- विरार: सर्वसाधारण
4. कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती
5. कोल्हापूर: ओबीसी
6. नागपूर: सर्वसाधारण
7. बृहन्मुंबई: सर्वसाधारण
8. सोलापूर: सर्वसाधारण
9. अमरावती: सर्वसाधारण (महिला)
10. अकोला: ओबीसी (महिला)
11. नाशिक: सर्वसाधारण
12. पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण
13. पुणे: सर्वसाधारण
14. उल्हासनगर: ओबीसी
15. ठाणे: अनुसूचित जाती
16. चंद्रपूर: ओबीसी (महिला)
17. परभणी: सर्वसाधारण
18. लातूर: अनुसूचित जाती (महिला )
19. भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण
20. मालेगाव: सर्वसाधारण
21. पनवेल: ओबीसी
22. मीरा- भाईंदर: सर्वसाधारण
23. नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण
24. सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण
25. जळगाव: ओबीसी (महिला)
26. अहिल्यानगर: ओबीसी (महिला)
27. धुळे: सर्वसाधारण (महिला)
28. जालना: अनसूचित जाती (महिला)
29. इचलकरंजी: ओबीसी




