⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | अर्जेंटिना आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये जळगाव जिल्ह्यातील प्राध्यापकाचे शोधनिबंध वाचन

अर्जेंटिना आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये जळगाव जिल्ह्यातील प्राध्यापकाचे शोधनिबंध वाचन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १८ जुलै २०२३ | सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी अर्जेंटिना या देशाची राजधानी ब्युनोस एअर येथे इंटरनॅशनल पॉलिटिकल सायन्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यशास्त्र विषयाच्या 27 व्या वर्ल्ड काँग्रेस या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शोधनिबंध वाचन केले.

दि. 15 जुलै ते 19 जुलै 2023 दरम्यान युनिव्हर्सिटी ऑफ कॅटोलिका अर्जेंटिना येथे होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी “रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा भारताच्या आर्थिक राजकीय आणि सामाजिक पैलूंवर झालेल्या परिणामांचा अभ्यास “या विषयावर शोधनिबंध सादर केला. शोधनिबंध वाचनाच्या वेळी चेअर पर्सन गुलिरिओ(कोलंबिया), समन्वयक अलिना विदिमिरोवा (रशिया), डॉ बेतीना रोंसिस्वली (अर्जेंटिना), गालारोटी(कोलंबिया), डॉ.मारिना लिनोस (जर्मनी), डॉ.अगस्ती मेरीसिस (पोर्तुगाल), प्रा.मरिसा अल्मदिया (लिस्बन) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी आपल्या शोधनिबंध मध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यातील युध्दाचा भारतावर आर्थिक,राजकीय, सामाजिक, काय काय परीणाम झाले याचे विवेचन केले. प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी आपल्या संशोधनासाठी प्रश्नावली पद्धतीचा अवलंब केला. भारतातील आणि भारताबाहेरील एकूण 194 व्यक्तींच्या प्रतिक्रिया प्राप्त झाल्या व त्यावरून निष्कर्ष काढले. भारतातील वाढलेल्या तेलाच्या किमती, शेअर मार्केट कोसळणे, भारताची तटस्थेतची भूमिका, युक्रेन मध्ये अडकलेले मेडिकल चे विद्यार्थी, त्यासाठी भारताने केलेले प्रयत्न, भारतातील विरोधी पक्षांनी सरकारला केलेले सहकार्य, भारत आणि रशिया यांच्यातील असलेले राजनायिक संबंध, भारतात युद्धामुळे झालेले सामाजिक बदल, गहू निर्यातीवर झालेले परिणाम,

रशिया युक्रेन युध्दाचे जागतिक परिणाम, भारतातील महागाई, जागतिक अन्न संकट, भारतीय रुपयाचे अवमूल्यन, खाद्य तेल, डिझेल, पेट्रोल,गॅस, यामध्ये झालेली वाढ, भारताची अलिप्तता वादाची भूमिका, भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधावर झालेले परिणाम, भारताचा जागतिक दृष्टिकोन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचेशी युद्ध थांबविण्यासाठी केलेले टेलिफोनीक संभाषण इत्यादी बाबींवर सखोल अभ्यास करून संशोधन पेपर वाचन केले. तसेच या प्रसंगी सभागृहात बोलताना प्रा डॉ सुनील नेवे यांनी जगातील आलेल्या सर्व प्रतिनिधींना सांगितले की, युद्ध नको बुध्द हवा, आम्हा भारतीयांच्या वतीने संदेश देवू इच्छितो की,आम्हाला जगात प्रेम, शांतता आणि आपुलकी व माणुसकी हवी आहे. त्यासाठी आपण सारे वचनबध्द होवू या.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.