विख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रताप जाधव यांचे निधन
जळगावचेल विख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रताप जाधव यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाच्या दीर्घ आजाराने शुक्रवारी ७ जुलै रोजी त्यांचे निधन झाले. रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मूळचे फुपनगरी, ता. जळगाव येथील रहिवासी असलेले डॉ. जाधव यांनी यांनी 1989 मध्ये एम. एस. आर्थोची पदवी मिळवली. त्यानंतर 1993 मध्ये त्यांनी जळगावात रुग्ण सेवा सुरू केली. सामाजिक क्षेत्रातील योगदान पाहता तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. वैद्यकीय सेवेसह डॉ. जाधव यांचे सामाजिक कार्यातही मोठे योगदान होते. जळगाव जनता बँकेच्या संचालक पदावर ते कार्यरत होते.
अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ संस्थेवरही त्यांनी काम केले होते तसेच जळगावात मतीमंद मुलांसाठी असलेल्या ‘आश्रय माझे घर’ या उपक्रमातही त्यांचा सक्रीय सहभाग होता. १५ वर्ष रोटरी ईस्टचे सदस्य तसेच केशवस्मृती प्रतिष्ठानच्या कार्यात त्यांचा व्यापक सहभाग होता.