जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । तालुक्यातील जामठी ते बोदवड हा नऊ कि.मी अंतर रस्त्याच्याची दूरअवस्था झाली आहे. ठिकठिकाणी धोकेदायक खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, धोकेदायक खड्डे बुजवण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे.
रस्त्याच्या दुरुस्तीचे काम गेल्या दोन वर्षांपुर्वी करण्यात आले होते. जामठी ते येवती दरम्यान साईबाबा मंदिराजवळ असलेल्या नाल्याजवळ मोठ्या प्रमाणावर लहान मोठे खड्डे पडलेले आहेत. अनेक वाहनधारकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने या ठिकाणी अनेक किरकोळ अपघात झालेले आहेत. खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळे रस्तादुरुस्तीची मागणी नागरिकांकडून होत आहे.