जळगाव जिल्हा

राज्यात धुवांधार पाऊस! आजचा दिवस जळगाव जिल्ह्यासाठी कसा जाईल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२३ । मागील काही दिवसांपासून राज्यात धुवांधार पाऊस कोसळत असल्यामुळे अनेक ठिकाणी नद्या नाल्यात पूर आलेत. तर मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी शाळांना सुट्या देण्यात आल्या आहे. दरम्यान, आज शनिवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील पहाटपासून पावसाच्या तुरळक सरी कोसळत असून जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट
पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून इथे अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईतही आज मुसळधार पाऊस हजेरी लावेल असा अंदाज आहे.मुंबई, ठाणे, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट असून मुसळधार पावसाचा अंदाज आहेराज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये आज ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे इथे हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी आजचा दिवस कसा जाईल?
दरम्यान, काल रात्रीपासून जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. आज शनिवारी पाहटपासून पावसाचे ढग दाटून आले असून जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

आगामी आठवड्यात जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता?
जिल्ह्यात गेल्या २१ दिवसातच पावसाने जुलै महिन्यातील एकूण पावसाच्या सरासरीचा टप्पा गाठला आहे. दरम्यान, आगामी आठवडाभर जिल्ह्यात दमदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. जुलै महिन्यातील पावसाची स्थिती पाहिली तर जुलै महिन्यात आतापर्यंत अलनिनोचा फारसा प्रभाव जाणवत नाही.आगामी काही दिवस बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अधिक विकसित होणार आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासहीत जळगाव जिल्ह्यात ठराविक तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या ३७ टक्के पाऊस झाला आहे. तर २१ जुलैपर्यंतच्या सरासरीचा ९१ टक्के पाऊस झाला आहे.

जळगांव जिल्हा 22/ 07/2023
अमळनेर-
बोदवड-7
भडगाव-13
भुसावळ-
पाचोरा-12
पारोळा-
जामनेर-5
चोपडा-8
चाळीसगाव-5
रावेर-15
मुक्ताईनगर-23
धरणगाव-14
यावल-37.3
एरंडोल-8
जळगाव-7.2

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button