जळगावात भारतीय अंडीखाऊ सर्पाची 23 वी नोंद !
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ । वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत वन्यजीव सूचीत श्रेणी एक मध्ये समाविष्ट असलेला दुर्मिळ भारतीय अंडीखाऊ सर्प वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्प रक्षक वासुदेव वाढे यांनी मेहरून परिसरात ऍड. सूरज जहागीर यांच्या निवास स्थानी वाचवला.
साप बघताच घाबरलेल्या नागरिकांना एक वेळ त्याला मारण्याचा विचार आला परंतु पुढच्या क्षणी त्याला वाचवले पाहिजे या भावनेतून ऍड जहागीर यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्परक्षक वासुदेव वाढे यांना कॉल केला वाढे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सर्प सुरक्षित रेस्क्यू केला. वाचवलेला सर्प हा भारतीय अंडीखाऊ सर्प असून शेड्युल एक मध्ये समावेश आहे आणि या दुर्मिळ सर्पाला न मारता आपण आम्हला बोलवले खऱ्या अर्थाने आपण या सर्पाचा जीव वाचवला आहे असे म्हणत वासुदेव वाढे यांनी नागरिकांचे आभार मानले.
मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक यांच्या निगराणीत वनविभागाच्या मार्गदर्शनात सदर साप सुरक्षित आधीवसात मुक्त करण्यात आला वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांनी 10 वर्षात जिल्हा भरात 22 भारतीय अंडीखाऊ सर्प वाचवले आहेत ही 23 वी नोंद ठरली या सर्प प्रजातींच्या रक्षणासाठी संस्थेचे सर्पमित्र ग्रामीण भाग, शेती शिवारात जनजागृती करत असतात.
वसुदेव वाढे यांनी दुर्मिळ सर्प वाचवल्या बद्दल अध्यक्ष रवींद्र फालक, सचिव योगेश गालफाडे, रवींद्र सोनवणे, बाळकृष्ण देवरे, राहुल सोनवणे, अमन गुजर यांनी त्यांचे अभिनंदन केले