गेल्या काही दिवसापासून कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा न झाल्यामुळे लसीकरण मोहीम थंडावली होती. मात्र मंगळवारी सायंकाळी दुसऱ्या डोस साठी ३०० लसींचा डोस प्राप्त झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कैलास पाटील यांनी दिली.
बुधवारी १४ जुलै रोजी सकाळी दहा वाजेपासून ज्यांचा पहिला डोस घेऊन ८४ दिवसपूर्ण झाले आहेत.व ज्या नागरिकांना लसीबाबतचा मेसेज प्राप्त झाला आहे अशा नागरिकांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे
एरंडोल येथे डीएसपी महाविद्यालयात (म्हसावद नाका) येथे संबंधित नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.