---Advertisement---
जळगाव जिल्हा कृषी महाराष्ट्र राजकारण

पीक विम्याचे पैसे मिळत नसतील तर विमा कंपन्यांसोबत दोन हात करण्यासाठी तयार : मंत्री बच्चू कडू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२३ । रावेर – यावल तालुक्यातील केळी उत्पादकांचे पीक विम्याचे पैसे मिळत नसतील तर विमा कंपन्यांसोबत दोन हात करण्यासाठी तयार आहोत असा थेट इशारा मंत्री बच्चु कडू यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिला आहे. याबाबत शेतकऱ्यांचे नेते,प्रहार पक्ष प्रमूख मंत्री बच्चुकडू यांच्याकडे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती देण्यास आली असल्याचे प्रहार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून तात्काळ मदत जाहीर करून थेट अर्थ सहाय्य करावे अशी मागणी करण्यात येणार आहे.

bachhu kadu jpg webp

यापूर्वी झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप पर्यंत शासनाकडून शेतकऱ्यांना मिळालेले नाही. यासोबतच शासनाने दिलेल्या पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आसमानी व सुलतानी संकटांत शेतकऱ्यांना सावरण्याची गरज असून प्रहार उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला कोणत्याही कागदपत्रां शिवाय जाचक अटीमध्ये न अडकवता थेट मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

---Advertisement---

राज्यात शेत बियाणांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर आला असताना अनेक ठिकाणी बोगसगिरी चे प्रकरण आढळून आले आहे. कृषी विभागाकडून राज्यभरात धाडसत्र राबवले जात आहे. मात्र शेतकऱ्यांची यामध्ये मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचा प्रकार या कारवायांमधून समोर आला आहे. राज्य सरकारने शेत बियाण्यांवरील जीएसटी माफ करावा अशी देखील मागणी प्रहार पक्षप्रमुख मंत्री बच्चुकडू यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसापासून रावेर – यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शासनाकडून नुकसान भरपाई बाबत पंचनामे जरी झाले असले तरी मागील पीक विम्याचे पैसे अद्याप पर्यंत मिळाले नाही, शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज रावेर – यावल विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी असलेल्या प्रहार उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख अनिल चौधरी यांनी शेतकऱ्यांचे कैवारी, शेतकरी नेते मंत्री महोदय बच्चुभाऊ कडू यांची भेट घेतली असता जळगाव जिल्ह्यात झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत संपुर्ण माहिती कथन केली आहे.

याबाबत लवकरच मंत्री बच्चु कडू केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या बाबत तसेच नुकसान भरपाई बाबत सरसकट मदत मिळावी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती करणार असल्याची माहिती दिली आहे. उत्पादकांसाठी कायमस्वरूपी काही उपाययोजना करण्यात येतात का याबाबत देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चर्चा केली जाणार असल्याचे मंत्री बच्चू कडू यांनी सांगितले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---