जळगाव शहर
पुन्हा कारवाई : ४६ किलो प्लास्टिक कॅरीबॅग जप्त
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । शहरातील नवी पेठेतील तेजस शिनकर ट्रेडर्स या दुकानावर प्लास्टिक बंदी अधिनियमानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई करत ४६ किलो प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करून ५ हजारांचा दंड वसूल केला आहे.
नवी पेठेतील तेजस शिनकर ट्रेडर्स या दुकानात प्रतिबंधित प्लास्टिक कॅरीबॅग असल्याची गोपनीय माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. या माहितीनुसार व आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या पथकाने अचानक पाहणी करून तपासणी केली. या तपासणीत त्या ठिकाणी प्लास्टिक कॅरीबॅग आढळून आल्यात. या कारवाईत ४६ किलो प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्य. दुकानदाराला ५ हजारांचा दंड करण्यात आला. ही कारवाई आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक रमेश कांबळे, जितेंद्र किरंगे व मुकादम दीपक तांबोळी यांच्या पथकाने केली.