⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | वाणिज्य | फाटलेल्या नोटेचे तुकडे असले तरी आता नो टेन्शन ; वाचा RBI ‘हे’ नियम आणि बदला असे नोटा

फाटलेल्या नोटेचे तुकडे असले तरी आता नो टेन्शन ; वाचा RBI ‘हे’ नियम आणि बदला असे नोटा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । बऱ्याच वेळा आपल्या हातात फाटलेली नोट पडते. तेव्हा काय करावे आणि काय करू नये हे आपल्याला कळत नाही. त्यावेळेस अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या मनात येतात. जसे की बँक या नोटा कोणी स्वीकारेल की नाही. नोट्स इत्यादींच्या बदल्यात आपल्याला किती पैसे मिळतील. असे बरेच प्रश्न बऱ्याचदा लोकांच्या मनात येत असतात. परंतु याचे उत्तर आता रिझर्व्ह बँकेनेच दिलं आहे.

फाटक्या नोटांबाबत आरबीआयने काही नियम बनवले आहेत आणि तुम्ही बँकेत जाऊन अशा नोटा बदलू शकता. तुम्ही बँकेत जुन्या आणि फाटलेल्या नोटा बदलू शकता. अगदी अनेक तुकडे झालेल्या नोटाही बदलल्या जाऊ शकतात आणि ज्या नोटा पूर्ण नाहीत, त्या नोटांच्या बदल्यात बँक त्यांच्या हिशोबाने पैसे देते. मात्र, नोटा बदलताना तुम्हाला बँकांचे नियम माहित असणं गरजेचं आहे.

बँकेचे नियम काय आहेत?

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) 2017 च्या एक्सचेंज करन्सी नोट नियमांनुसार, जर तुम्हाला कधी एटीएममधून फाटलेल्या नोटा मिळाल्या तर तुम्ही ते बँकेतून सहज बदलू शकता. बँकेला नकार देण्याचा अधिकार नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल की या कामात बराच विलंब लागेल, तर तुम्हाला याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. बँकेतून नोटा बदलण्याच्या प्रक्रियेस जास्त वेळ लागत नाही, हे काम काही मिनिटांत करता येते.

नोट कशी बदलायची?
यासाठी तुम्हाला ज्या बँकेतून पैसे काढले आहेत त्या बँकेत जावे लागेल. तिथे जाऊन तुम्हाला एक अर्ज लिहावा लागेल. यामध्ये तुम्हाला पैसे काढण्याची तारीख, वेळ, कोठून पैसे काढले गेले, त्याचे नाव नमूद करावे लागेल. एटीएम स्लिप अर्जासोबत दाखवावी लागते आणि जर स्लिप घेतली नाही तर एसएमएस फोनवर दाखवावा लागेल, ज्यामध्ये डेबिटची माहिती देण्यात आली आहे.

कुठल्या प्रकारच्य नोटा बदलून मिळतात.

अगदी जरी एका नोटचे अनेक तुकडे झाले, तरी ते बँकेत बदलून मिळू शकतात. फाटलेल्या नोटेचा कोणताही भाग गहाळ झाला तरी बँक ती नोट बदलून देऊ शकते. मात्र जर नोटा पूर्णपणे फाटलेल्या आहेत, पूर्णपणे कापल्या किंवा जळालेल्या आहेत तर, त्या फक्त RBI च्या इश्यू ऑफिसमध्ये बदलता येऊ शकतात. थोड्याफार फाटलेल्या नोटा तर कुठल्याही सरकारी बँकेतून बदलून मिळू शकतात. नोटा बदलण्यासाठी तुम्हाला आरबीआयने जारी केलेला फॉर्म भरावा लागतो, जो सरकारी बँकेत सहज मिळतो.

तर बँकांकडून केला जाणार दंड वसूल 
रिझर्व्ह बँकेने जुलै 2016 मध्ये एका परिपत्रकात म्हटले होते की जर बँकांनी खराब नोटा बदलण्यास नकार दिला तर त्यांना 10,000 रुपये दंड आकारला जाईल. RBI चा हा नियम सर्व बँकांच्या सर्व शाखांवर लागू केला जाईल.

नोटा बदलण्याचं क्लिष्ट गणित सोप्या भाषेत!

जर 50 रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या नोटेचा सर्वात मोठा तुकडा, हा नोटच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर या नोटच्या बदल्यात त्याचे पूर्ण मूल्य बँक देते. जर 50 रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटचा सर्वात मोठा तुकडा, त्या नोटपेक्षा 80 टक्के किंवा जास्त असेल, तर तुम्हाला या नोटच्या बदल्यात संपूर्ण रक्कम दिली जाते. म्हणजे त्या नोटेचा 80 टक्के भाग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे.
जर 50 रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटचा सर्वात मोठा तुकडा, हा नोटच्या 40 ते 80 टक्के दरम्यान असेल, तर तुम्हाला त्या नोटचे अर्धच मूल्य मिळतं.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.