⁠ 
सोमवार, मार्च 4, 2024

RBI ने ‘या’ व्यवहारांसाठी UPI पेमेंटची मर्यादा 1 लाखांवरून केली 5 लाख

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२३ । देशात दररोज यूपीआय व्यवहारांची संख्या वेगाने वाढत आहे. परंतु, ऑनलाइन पेमेंट करताना युजर्सला UPI ट्रांजेक्शनसाठी लिमिट असल्यामुळे बरेचदा मोठे व्यवहार करताना नाकी नऊ येतात. अशातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही ठिकाणी UPI द्वारे पेमेंट करण्याची मर्यादा वाढवली आहे. RBI ने हॉस्पिटल आणि शाळेच्या UPI ट्रांजेक्शन लिमिटमध्ये वाढ केली आहे.

हॉस्पिटल आणि शाळांच्या UPI च्या व्यवहाराची मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे संस्थांमध्ये यूपीआयच्या वापराला चालना मिळणार आहे. यामुळे रुग्णालयाचे बिल आणि शाळा-कॉलेजची फी भरताना होणारी गैरसोय कमी होईल.

खरे तर जेव्हापासून देशात डिजिटल पेमेंट सुरू झाले. तेव्हापासून काहीही खरेदी करण्यासाठी जवळ कॅश ठेवण्याची गरज फारच कमी झाली आहे. बहुतांश ठिकाणी पेमेंट UPI द्वारे केले जाते. यामुळेच दर महिन्याला UPI व्यवहारांची संख्या वाढत आहे.

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज शुक्रवारी एमपीसीच्या घोषणेमध्ये सांगितले की रेपो दरात कोणताही बदल केला जात नाही. याशिवाय, त्यांनी रुग्णालये आणि शाळा आणि महाविद्यालयांमध्ये UPI व्यवहारांची मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. आता रुग्णालयात पैसे जमा करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही.