⁠ 
शनिवार, मे 18, 2024

RBI चा लाखो खातेदारांना धक्का ; आता ‘या’ तीन बँकांवर लादले निर्बंध, किती पैसे काढता येणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२२ । मागील गेल्या काही दिवसात भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने अनेक बँकांवर निर्बंध लादले आहे. अशातच आता आणखी तीन बँकांवर निर्बंध लादल्याने लाखो खातेदारांना धक्का बसला आहे. तीन सहकारी बँकांची बिघडलेली आर्थिक स्थिती पाहता RBI ने त्यांच्यावर पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादले आहेत. आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक, बसमतनगर येथील बंदीमुळे खातेदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. RBI Restrictions on Three Banks

आता या बँकांवर बंदी घालण्यात आली आहे
याशिवाय सोलापूर येथील करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यातून केवळ 10,000 रुपये काढता येणार आहेत. आरबीआयने विजयवाडा येथील दुर्गा को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेवरही बंदी घातली आहे. त्याचे ग्राहक त्यांच्या ठेवींमधून 1.5 लाख रुपये काढू शकतात.

RBI नुसार व्यवहार केले जातील
याआधीही आरबीआयने अनेक बँकांविरोधात कठोर निर्णय घेतले आहेत. अलीकडेच आरबीआयने चार बँकांवर निर्बंध लादले आहेत. या चार बँकांशी निगडित ग्राहकही आरबीआयने ठरवून दिलेल्या मर्यादेनुसारच पैसे काढू शकतील. साईबाबा जनता सहकारी बँक, द सूरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सुरी (पश्चिम बंगाल) आणि नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ बहराइच या चार सहकारी बँकांवर अलीकडेच बंदी घालण्यात आली आहे.

यापेक्षा जास्त रक्कम काढण्यास मनाई
या आदेशानुसार साईबाबा जनता सहकारी बँकेचे ठेवीदार 20 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकत नाहीत. तर सुरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव्ह बँकेसाठी ही मर्यादा 50,000 रुपये आहे. त्याचप्रमाणे नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बाबतीत, पैसे काढण्याची मर्यादा प्रति ग्राहक 10,000 रुपये करण्यात आली आहे. RBI ने बिजनौर-आधारित युनायटेड इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि. वर अनेक निर्बंधांसह ग्राहकांकडून पैसे काढण्यावर बंदी घातली आहे.