⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

कर्ज घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी! रेपो दराबाबत RBI ने घेतला ‘हा’ निर्णय

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२३ । घर आणि कार लोन घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज (8 डिसेंबर) पतधोरण जाहीर केले असून त्यानुसार आरबीआयने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. सलग पाचव्यांदा रिझर्व्ह बँकेचे रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.रेपो दर 6.50 वर कायम ठेवण्यात आला आहे.

चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत ५-१ मतांनी हा निर्णय घेण्यात आला. RBI गव्हर्नर शशिकांत दास यांच्या म्हणण्यानुसार, “कर्जाची वाढती पातळी, भू-राजकीय तणाव आणि टोकाचे हवामान यामुळे जागतिक अर्थव्यवस्था अजूनही खूपच नाजूक आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे बदल अर्थव्यवस्थेसाठी चांगले होणार नाहीत.” रेपो दर सलग पाचव्यांदा ६.५ टक्क्यांच्या पातळीवर कायम आहे. याआधी शेवटचा रेपो दर फेब्रुवारी २०२३ मध्ये ६.५ टक्के केला होता.

आर्थिक विकास दराचा अंदाज ७ टक्के वाढला
चलनविषयक धोरणाचा आढावा सादर करताना आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, जागतिक अनिश्चितता असूनही देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे, आपला पाया मजबूत आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी एमपीसीने अनुकूल भूमिका मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी आर्थिक विकास दराचा अंदाज 6.5 ते 7 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. बँका आणि कॉर्पोरेट्सच्या मजबूत दुहेरी शिल्लकमुळे आगामी काळात खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढेल.

महागाईचा दर चार टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य
शक्तिकांता दास यांनी अन्नधान्याच्या महागाईवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाईचा दर ५.४ टक्के असेल. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत किरकोळ महागाई 5.6 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.2 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. सध्या महागाईचा दर चार टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य गाठता आलेले नाही. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की एसडीएफ दर 6.25 टक्के आणि एमएसएफ दर 6.75 टक्के कायम आहे.