---Advertisement---
नोकरी संधी

RBI मध्ये अधिकारी होण्याची सुवर्णसंधी.. पदवीधरांसाठी बंपर भरती सुरु

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आलीय. RBI ग्रेड-बी ऑफिसरच्या 291 पदांच्या भरतीची अधिसूचना नुकतीच जारी केली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा लागेल. RBI Grade B Recruitment 2023

rbi bharti jpg webp webp

ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया आज म्हणजेच 9 मे 2023 पासून Opportunities.rbi.org.in वर सुरू झाली आहे. लक्ष्यात ठेवा अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 जून 2023 असेल

---Advertisement---

रिक्त पदांचा तपशील :
ग्रेड बी ऑफिसर जनरलसाठी 222, इकॉनॉमिक अँड पॉलिसी रिसर्च (DEPR) ग्रेड बी ऑफिसरसाठी 38 आणि स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट (DSIM) ग्रेड बी ऑफिसर विभागासाठी 31 रिक्त जागा आहेत.

मुंबईत तब्बल 4374 पदांची भरती सुरु

परीक्षेच्या तारखा
ग्रेड ब अधिकारी जनरल – टप्पा – 1 – 9 जुलै पासून. आणि टप्पा 2 – 30 जुलै 2023.
ग्रेड बी अधिकारी DEPR – टप्पा – 1 – 16 जुलै पासून. आणि दुसरा टप्पा – 2 सप्टेंबर 2023 पासून
ग्रेड बी अधिकारी DSIM – फेज – 1 – 16 जुलै पासून. आणि दुसरा टप्पा – 19 ऑगस्ट 2023 पासून.

वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे.

शैक्षणिक पात्रता
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ग्रेड बी ऑफिसरच्या भरतीसाठी, असे उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून किमान 60 टक्के गुणांसह किंवा किमान 55 टक्के गुणांसह कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केली आहे. पीजी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
(पदांनुसार आवश्यक पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी)

वेतनश्रेणी
35150-1750(9)-50900-EB-1750(2) – 54400-2000(4)-62400 (16 वर्षे)
सुरुवातीला मूळ वेतन 35,150/- प्रति महिना असेल.
आणि DA सह अनेक प्रकारचे भत्ते
सुरुवातीला, भत्त्यांसह वेतन सुमारे 83254 रुपये प्रति महिना असू शकते.

निवड- उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमधील कामगिरीच्या आधारे केली जाईल.

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---