---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

Breaking ! जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्रभैय्या पाटील यांचे नाव निश्चित, पण..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२३ । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली होती. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांचे नाव निश्चित केल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मात्र, यानंतर नाट्यमय घडामोडी घडत अध्यक्षपदासाठी बंडखोरीची चर्चा सुरु झाली असून रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित झाल्यांनंतरही अजून दोन अर्ज दाखल झाले असल्याची कळते. Ravindra Patil Selected as President of Jalgaon District Central Co-operative Bank

JDCC Bank ravindra patil jpg webp webp

जळगाव जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची आज (शनिवार) निवड होत आहे. महाविकास आघाडी व शिवसेना शिंदे गट यांची संयुक्त सत्ता असून महाविकास आघाडीकडे अध्यक्षपद तर शिंदें गटाकडे उपाध्यक्ष पद असणार आहे.

---Advertisement---

अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ऍड रवींद्रभैय्या पाटील, संजय पवार, डॉ.सतीश पाटील व प्रदीप देशमुख यांच्या नावाची चर्चा होती. मात्र रवींद्रभैय्या पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. मात्र त्यावर अंतिम शिक्कामोर्तब अद्यापही झाली नाही. यास राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडखोरीची चर्चा आहे. जिल्हा बँकेच्या सभागृहात आज सकाळी 11 वाजता निवड प्रक्रियेला सुरुवात झाली.

दरम्यान, उपाध्यक्षपदाची देखील निवड केली जाणार आहे. उपाध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटांचे अमोल चिमणराव पाटील यांच्या नावांची चर्चा असून उपाध्यक्ष पदाचे नाव पालकमंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या बैठकीत निश्चित करण्यात येणार असल्याचे समजतेय.

दरम्यान, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे माजी आमदार गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी राजीनामा दिल्याने ही निवड होत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---