रावेर तालुका तरुणाच्या खुनाच्या घटनेने हादरला

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२३ । जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येतेय. दरम्यान, आता रावेर तालुका खुनाच्या घटनेनं हादरला आहे. तालुक्यातील निमड्या गावातील 32 वर्षीय इसमाचा खून करण्यात आला आहे. संजय बारेला (32, निमड्या, ता.रावेर) असे खून झालेल्याचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. बारेला यांचा खून कुणी व का केली? याची माहिती अद्याप निष्पन्न झालेली नाही.
रावेर

निमड्या गावापासून जवळच संजय बारेला यांचा खून झालेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना शनिवारी सकाळी आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, रावेरचे पोलिस निरीक्षक कैलास नगरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांनी धाव घेतली.

घटनास्थळी डॉग स्कॉड व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. मयताच्या खुनाचे कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून तपासाला वेग देण्यात आला आहे.