रावेरात प्रहार जनशक्तीला धक्का ; युवा जिल्हाध्यक्षांसह अनेक कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

मार्च 14, 2023 2:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२३ । राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटातील एक एक नेते पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहे. तर दुसरीकडे काही पक्षातील पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचे दिसून येतेय. अशातच रावेर परिसरात प्रहार जनशक्ती पक्षाला खिंडार पडलं आहे. तो म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजेंद्र महाजन आपल्या समर्थकांसह मातोश्री येथे जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.

prahar janshakti parti jpg webp webp

यांनी केला प्रवेश
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्याहस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हाध्यक्ष तथा रावेर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र रामदास महाजन याचा जाहीर प्रवेश मुंबई येथे करण्यात आला. सोबत प्रहारचे रावेर तालुक्यातील उपतालुका प्रमुख भगवान कोळी, प्रहारचे रावेर उपशहरप्रमुख शेख लतीफ यांनी प्रवेश केला.

Advertisements

याप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख दिपकभाऊ राजपुत, शिवसेना उपतालुका प्रमुख नितीन महाजन, उपविभाग प्रमुख स्वप्नील गिरडे, तुषार निंबाळकर आदी उपस्थिती होती.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now