⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

राऊत म्हणाले.. गुवाहाटीला ज्यांना जायचं असेल त्यांनी जावे!

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले असून सरकार कोसळणार का? अशी शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील स्थिती लक्षात घेत सकाळी शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी एक ट्विट केले होते. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने.. असल्याचे खा.राऊत यांनी म्हटले होते. दरम्यान, राऊत यांच्या ट्विटवर विचारणा केली असते आजवरचा इतिहास पाहता ज्या ज्या ठिकाणी असे बंड पुकारण्यात आले त्याठिकाणी विधानसभा बरखास्त करण्यात आले होते. त्यादृष्टीने मला चित्र दिसत असून तसे ट्विट मी केल्याचे खा.संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

राज्यातील सध्याच्या घडामोडींवर एक सूचक ट्विट खा.संजय राऊत यांनी केले होते. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने.. असल्याचे खा.राऊत यांनी म्हटले होते. राऊत यांच्या ट्विटमुळे सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार का? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दुसरीकडे राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाराज झाल्याची माहिती समोर आली होती. सरकार बरखास्त करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा करायला पाहिजे होती. याबद्दलची माहिती महाविकास आघाडी सरकारमधील एखाद्या जबाबदार नेत्याने किंवा मंत्र्याकडून अथवा मुख्यमंत्र्यांकडून दिली गेली पाहिजे होती, असा सूर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लावला आहे.
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचा टांगा पलटी, घोडे फरार

सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे जास्तीत जास्त काय होईल, आमची सत्ता जाईल ना? सत्ताही परत मिळवता येईल. पण पक्षाची प्रतिष्ठा ही आमच्यासाठी सर्वोच्च आहे. एकनाथ शिंदे हे सध्या आमच्यापासून लांब आहेत, ते जवळ आल्यावर आम्ही त्यांच्याशी बोलू. एकनाथ शिंदे हे माझे फक्त सहकारी नव्हेत तर मित्रही आहेत. आम्ही गेली ३५-४० वर्षे एकत्र काम करतोय. उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांचे असेच नाते आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे आमदार प्रथम सूरत आणि आता गुवाहाटीमध्ये गेले आहेत. आमदारांनी पर्यटन करणे ही चांगली गोष्ट आहे. पण ते परत येतील, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

राऊत पुढे म्हणाले कि, गुवाहाटीला एक उत्तम काझीरंगा अभयारण्य आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून तिकडे पाऊस सुरु आहे. निसर्गरम्य अभयारण्य पाहण्यासाठी ज्यांना जायचे असेल त्यांनी जावे. आमदारांनी देश फिरायला हवा. देश फिरल्याने नवनवीन माहिती त्यांना समजते, असे खा.संजय राऊत म्हणाले आहे.