भगवान नेमिनाथ रथ महोत्सवानिमित्त जि.प.सदस्य प्रताप पाटील यांच्या हस्ते रथ पूजन
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । नशिराबाद येथे श्री 1008 भगवान नेमिनाथ रथ महोत्सव सोहळ्यानिमित्त जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रथ पूजन करण्यात आले.
नशिराबाद येथे श्री 1008 भगवान नेमिनाथ रथ महोत्सव सोहळ्यानिमित्त जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रथ पूजन करण्यात आले. 88 वर्षांपासून ही परंपरा सुरु असून यंदा कोरोनामुळे भगवान नेमिनाथ रथ पाच पाऊल पुढे सरकवून पूर्ववत जागेवर विराजमान करण्यात आला. दरम्यान, या ठिकाणी मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू असून पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी यावेळी दिले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, युवासेना शहरप्रमुख चेतन बऱ्हाटे, योगेश पाटील, शिवसेना शहर अध्यक्ष विकास धनगर, जैन समाज अध्यक्ष दिनेश जैन, उपाध्यक्ष मंगेश जैन, सचिव महावीर जैन, ट्रस्ट मंडळ विजय जैन, महेश जैन, भूषण जैन, दिलीप जैन व समस्त जैन भक्तगण उपस्थित होते. सम्यकवर्धिनी महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले.