जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२२ । कोरोनाच्या तब्बल दोन वर्षानंतर यंदा गणेशोत्सवानंतर नवरात्री धुमधडाक्यात साजरी होत आहे. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे पाचोरा येथील माई मंडळ आणि शिंदे अकॅडमी तर्फे ‘रास गरबा दांडिया’ साजरा करण्यात आला. यावेळी शहारातील नागरिकांनी या उत्सवात उत्साहाने भाग घेतला होता.
विशेष म्हणजे, दांडिया असेल गरबा असेल शहरात माई मंडळ आणि शिंदे अकॅडमी नेहमी अग्रेसर असते. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘रास गरबा दांडिया’ साजरा करण्यात आला.