महिला डॉक्टरसोबत रुग्णालयातीलच कर्मचाऱ्याने केला विनयभंग ; गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२४ । विश्रांती करीत असलेल्या खोलीमध्ये जाऊन आक्षेपार्ह फोटोंची धमकी देत महिला डॉक्टरसोबत अश्लील वर्तन करीत तिचा रुग्णालयातीलच कर्मचाऱ्याने विनयभंग केला. तसेच विवाहितेच्या कुटुंबातील सदस्यांना ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी रुग्णालयात घडली. याप्रकरणी हिमालय कांतीलाल वाघेला याच्याविरुद्ध २६ एप्रिल रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासगी रुग्णालयामध्ये सहायक नेत्र चिकित्सक म्हणून काम करणाऱ्या एका विवाहितेची १४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारच्या सुमारास तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्या एका खोलीमध्ये विश्रांती करीत होत्या याचवेळी तेथे काम करणारा हिमालय वाघेला हा त्या ठिकाणी आला आणि त्याने दरवाजा बंद करून विवाहितेसोबत जबरदस्ती करू लागला. त्यानंतर पुन्हा १७ एप्रिल रोजी सायंकाळी वाघेला याने विवाहितेसह तिच्या पतीला शिवीगाळ करीत सासू आणि मुलीला ठार मारण्याची धमकी दिली.