---Advertisement---
मुक्ताईनगर गुन्हे

संतापजनक ! नात्यातीलच व्यक्तीने केला मतिमंद मुलीवर बलात्कार, घटनेने जिल्हा हादरला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । महिलांसह मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालले असून अशातच आता जळगाव जिल्ह्यात बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आलीय. मुक्ताईनगर तालुक्यात मतिमंद मुलीवर नात्यातीलच व्यक्तीने केला बलात्कार केल्याची घटना समोर आलीय. दरम्यान, नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

crime 2022 06 10T104930.183 jpg webp

काय आहे नेमकी घटना?

---Advertisement---

पीडित मुलगी मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावामध्ये राहते. दि. 9 रोजी दुपारी दोन वाजता मतिमंद मुलीचे आई वडील शेतात गेले होते. हीच संधी साधून आरोपीने मतिमंद मुलीला शेजारच्या घरात जबरदस्तीने नेत बलात्कार केला. त्यानंतर तो पसार झाला. मुलीच्या आई वडील शेतातून घरी आल्यानंतर मुलीने इशारा करून सर्व हकीकत सांगितले ऐकताच आई वडिलांना धक्काच बसला. काय करावे कुठे जावे पूर्ण कुटुंब चिंतेत पडले.

आरोपी हा नात्यातीलच असून नात्याला काळीमा फासणारी घटना आहे. अखेर पोलीस स्टेशन गाठत रात्री दीड वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री गुन्हा दाखल होताच मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आर पी बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून जलद गतीने तपास चक्र फिरवून रात्री साडेतीन वाजता आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध भादवी कलम 376, 376 (2)( एल ),376 ( 2)( जे) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुलीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर पी बोरकर करत आहे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---