---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

जळगावात रॅनसमवेअर व्हायरस : १३ संगणकांचा डाटा डिलीट

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२१ । अवघ्या काही दिवसापूर्वी लाँच झालेल्या ‘रॅनसमवेअर’ व्हायरसमुळे जळगावातील प्रचिती मीडिया या कार्यालयाचे १३ संगणक निकामी झाल्याचा प्रकार रविवारी दुपारी समोर आला आहे. हा प्रकार घडल्यानंतर प्रचिती मीडियाचे घुगे यांनी थेट सायबर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. 

Ransomware virus jpg webp

या व्हायरसमुळे जगभरातील जवळपास १५०० कंपन्यांचे काम ठप्प झाल्याचे वृत्त असून त्यामुळे चिंता वाढली आहे. 

---Advertisement---

जळगावातील प्रचिती मीडिया या कार्यालयात नियमित काम सुरू होते. अचानकपणे त्यांच्या संगणकावर एक संदेश धडकला. यानंतर सर्व १३ संगणकातील संपूर्ण डाटा डिलीट झाला. फोटो, मजकूर, ई-मेल सर्व माहिती डिलीट झाली. 

दरम्यान, त्यांना प्राप्त झालेल्या संदेशात हा सर्व डाटा पुन्हा हवा असल्यास ९८० डॉलर्स (सुमारे ८० हजार रुपये) प्रति संगणक पेड करा. त्यानंतर एक सॉफ्टवेअर प्राप्त होईल. त्याने सर्व डाटा पुन्हा मिळवता येईल. ७२ तासांच्या आत पैसे भरल्यास ५० टक्के सूट देण्यात येईल, असा हा संदेश आहे. यानंतर प्रचिती मीडियातील सर्व संगणक निकामी झाले. 

त्यावर कोणत्याही प्रकाचे काम केल्यास ते सेव्ह होत नाही. सेकंदात सर्व फाइल्स डिलीट होत आहेत. हा प्रकार घडल्यानंतर प्रचिती मीडियाचे घुगे यांनी थेट सायबर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी या व्हायरस संदर्भात माहिती घेतली असता अद्याप त्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना नसल्याचे उत्तर दिले आहे. जगभरातील सुमारे १५०० मोठ्या कंपन्यांच्या संगणकात हा व्हायरस शिरला असून त्यांचे काम पूर्णपणे ठप्प झाच्याची माहिती घुगे यांना पोलिसांकडून देण्यात आली आहे.  

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---