⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

‘फिट इंडिया मुव्हमेंट’च्या ब्रँड अँबेसेडरपदी जळगावचा रणजितसिंग राजपूत

Bhusawal News- जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । केंद्र सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राबविले जाणारे ‘फिट इंडिया’ अभियान तळागाळापर्यंत पोहचावे तसेच आरोग्य विषयी जनजागृती व्हावी व देशभरात ‘फिट इंडिया’ उपक्रमात राबविण्यात येणाऱ्या उपक्रम जसे ‘फिट इंडिया फ्रीडम रण, फिट इंडिया प्लॉगिंग रण, ‘फिट इंडिया सायकलाथॉन, फिट इंडिया क्विझ या सारख्या उपक्रमांमध्ये जास्तीतजास्त युवकांना सहभागी करून घेत तळागाळातील युवकांमध्ये फिटनेस च्या बाबतीत जागरूकता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने भुसावळच्या रणजितसिंग राजपूत यांची फिट इंडिया अँबेसिडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने फिट इंडिया क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी फिट इंडिया व स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (साई) च्या वतीने देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातून काही तरुण व तरुणींची निवड केलेली आहे. रणजितसिंग राजपूत यान एकता विश्नोई भा.रा.से.(फिट इंडिया मिशन निदेशक, भारत सरकार) यांच्या वतीने फिट इंडिया अँबेसिडर म्हणून नियुक्ती झाल्याच्या पत्र प्राप्त झाले.

रणजितसिंग राजपूत यांनी युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र संघटनेच्या वतीने राज्य निदेशक प्रकाश मनुरे व जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली फिट इंडिया अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील विविध उपक्रम घेऊन जिल्हा स्तरावर कार्य केले आहे. त्यात प्रामुख्याने भुसावळ शहरात आयोजित केलेला जिल्हास्तरीय ‘चेतक रण’ हा विशेष उल्लेखनीय ठरला तसेच भुसावळ शहरात ऑलम्पियन मनोज कुमार यांना बोलावून युवकांमध्ये फिटनेस च्या बाबतीत जनजागृती घडवून आणली यांच प्रकारे केलेल्या कार्याची केंद्र सरकारने दखल घेत त्यांची नियुक्ती फिट इंडिया अभियानासाठी केली आहे. यापूर्वी रणजितसिंग राजपूत ह्यांना युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा युवक क्षेत्रात सर्वश्रेष्ठ ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ मिळलेला आहे व या अगोदर ते स्वच्छ भारत अभियान व महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाचे सुद्धा ब्रँड अँबेसिडर म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या विविध योजनांमध्ये त्यांचा सहभाग असतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन फिट इंडिया मोहिमेची घोषणा केली तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने ही संकल्पना केंद्र सरकार मार्फत कार्यान्वित केली आहे दैनंदिन दैनंदिन जीवनात खेळ व व्यायामाचा अंतर्भाव करून प्रत्येक नागरिकांनी स्वतःला आरोग्य संपन्न ठेवावे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या राष्ट्रीय मोहिमेत कार्य करण्याची संधी मिळाल्यामुळे मी केंद्र सरकारचा आभारी आहे. – रणजितसिंग राजपूत