जळगाव लाईव्ह न्यूज । हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी समिती, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ आणि गोदावरी फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विजयादशमी अर्थात गुरुवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी नटवर थिएटर समोर, सरस्वती डेअरी जवळ येथे शस्त्रपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे

शस्त्रपूजन ही सनातन हिंदु धर्माची शौर्यशाली परंपरा आहे. वर्तमान स्थितीत अचानक उद्भवलेल्या प्रतिकूल प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी रणरागिणीमध्ये चैतन्य निर्माण व्हावे तसेच शौर्य जागृतीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी विजयादशमीच्या दिवशी रणरागिणी शस्त्रपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे हे वर्ष द्वितीय असून मैं दुर्गा हूं, धर्म की ज्वाला हूं हे ब्रीद वाक्य आहे. गुरुवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता महिलांच्या हस्ते शस्त्रपूजन केले जाणार आहे. त्यानंतर शौर्य जागृत करणारी प्रात्यक्षिके, रणरागिणी मार्गदर्शन, उत्साह पूर्वक शौर्य गीताचे सादरीकरण येथे होईल. तरी शहरातील शाळा-महाविद्यालयातील मुलींनी, महिला मंडळांनी उपस्थित राहावे असे आवाहन रणरागिणीच्या प्रमुख सायली पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी हिंदू जनजागरण समितीचे श्री प्रशांत जुवेकर यांच्याशी ९५५२४२६४३९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

स्त्री ही शक्ती स्वरूपा असून स्वतःच्या शक्ती चा तिला विसर पडला आहे. तिने जर ठरविले तर दुर्गा आणि काली बनून अन्याया विरुद्ध शस्त्र आणि शास्त्र दोघांनी ती समाजकंटकांचा नायनाट करू शकते …आणि त्याच शक्ती ची आठवण करून देण्या साठी व तुमच्यात तुमचाच जागर व्हावा म्हणूनच रणरागिणी शस्त्रपूजनाचा अलौकिक व पुज्यनिय समारंभाचे आयोजन केले आहे तरी.. सर्व महिला, भगिनी, व विशेषकरून बालिकाना आवाहन करीत आहे कि आवर्जून शस्त्रपूजनास हजर राहून स्वतःया हृदयात अद्वितीय शक्तीचे दीप तेजाळावे.
- सौ. अनुराधा लक्ष्मण वाणी, सहा. सरकारी अभिवक्ता, शेशन्स कोर्ट, जळगाव
शस्त्र म्हणजे केवळ धातू नव्हे, शस्त्र म्हणजे अचल शक्ती, आत्मविश्वास आणि रणशौर्याचा जाज्वल्य दीप!
अनादी काळापासून आपल्या धर्मभूमीत शस्त्रपूजन हे वीरत्व, साहस आणि धर्मरक्षणाचे पवित्र प्रतीक राहिले आहे.
काळाच्या ओघात मंदावलेली ही शौर्यपरंपरा पुन्हा प्रज्वलित करण्याचा जिद्दीचा संकल्प आम्ही युवती रणरागिणी शस्त्रपूजनातून साकारत आहोत!
- सायली पाटील, हिंदु जनजागृती समिती
रणरागिणी शस्त्रपूजन’ हा उपक्रम महिलांच्या आत्मविश्वास, शारीरिक-मानसिक ताकद आणि स्वसंरक्षण कौशल्यासाठी उपयुक्त ठरतो.
भीतीचा सामना करायला शिकल्यामुळे मानसिक सक्षमता निर्माण होते, इतरांशी संवाद साधून त्यांच्यामध्ये मिसळण्याची कौशल्ये निर्माण होतात. या कार्यक्रमातून महिलांना धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण, संकटांना सामोरे जाण्याची तयारी व निर्णयक्षमतेचा आत्मविश्वास मिळतो.
शौर्य, शिस्त आणि स्वाभिमानाची परंपरा जपणारा हा उपक्रम प्रत्येक युवतीसाठी अत्यंत आवश्यक आहे.
- सौ. चित्रा सौरभ चौधरी, भरारी फाउंडेशन








