जळगाव लाईव्ह न्युज । ९ मे २०२२ । मुंबई सत्र न्यायालयाने खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi rana) यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या पुन्हा एकदा अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने नोटीस बजावून तुमचा रद्द का करू नये याचे उत्तर राणा दाम्पत्याकडे मागितले आहे. कारण त्यांनी जामीनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावरती पोलिसांनी केला आहे.
राणा दाम्पत्याच्या वक्तव्याने जामीन अटीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे जामीन आदेशानुसार त्यांचा जामीन रद्द करण्यात आला आहे, असा अर्ज मुंबई पोलिसांनी न्यायालयात दाखल केल्यानंतर ही नोटीस देण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी या दाम्पत्याने जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा अर्ज कोर्टात दिला होता. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्यात यावे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. खरेतर, राणा दाम्पत्याचा जामीन अर्ज मंजूर करत त्याना मुंबई सत्र न्यायालयाने मीडियासमोर न बोलण्याची अट घातली होती. त्या अटीचं राणा दाम्पत्याकडून उल्लंघन झाल्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
रविवारी सकाळी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जाहीरपणे मीडियाशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी राज्य सरकारवरती जोरदार टीका केली. तसेच राज्यात सुरु असलेल्या नाट्याला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचं सुध्दा त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी न्यायालयात एक अर्ज दाखल केल्यानंतर ही नोटीस देण्यात आली आहे.