जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२२ । जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून कल्याणे होळ येथील सरपंच तथा राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष रमेश राजाराम पाटील यांची महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे. या संदर्भात शासनाचे उपसचिव संजय धुरी यांचे पत्र प्रशासनाला प्राप्त झाले आहे.
या बद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, माजी पालकमंत्री सतीश पाटील, काँग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी.पाटील, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, अरविंद मानकरी, कल्पनाताई अहिरे, अमित पाटील, नगरसेवक अभिजित पाटील, सेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, सुरेश चौधरी, मोहन पाटील, कल्पिता पाटील यांनी त्यांचे काैतुक केले आहे.
हे देखील वाचा :
- समाजाशी नाळ जोडून ठेवणे आपले कर्तव्य : आमदार राजूमामा भोळे
- खातेवाटपनंतर मंत्री गुलाबराव पाटीलांची पहिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले..
- प्रवाशांसाठी खुशखबर! जळगाव, भुसावळमार्गे धावणार ‘या’ नवीन रेल्वे गाड्या
- जळगावातील तापमानाचा पारा वाढला, खान्देशात पुढचे तीन दिवस असं राहणार तापमान?
- जळगावात सोन्यासह चांदीचा भाव वाढला; आता १० ग्रॅमचा भाव काय?