जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२४ । पुण्यातील हिट अँण्ड रन प्रकरणात जसे नवनवीन टेस्ट समोर येत आहेत तसेच रामदेववाडी अपघात प्रकरणात देखील नवी नवीन ट्विस्ट समोर येऊ लागली आहेत. घटना घडली तेव्हा, त्याच्यापूर्वी व घटनेनंतर अटकेतील आरोपी कोणाच्या संपर्कात होते, त्यांच्यात काय बोलणं झालं. हे आता समोर येणार आहे. पोलिसांनी अटकेतील तिन्ही आरोपींचे सीडीआर, एसडीआर काढले असून हे सारेच जण चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. यातील काही जण बाहेरगावी असल्याने त्यांची चौकशी होऊ शकली नाही, मात्र त्यांना लवकरच चौकशीला सामोर जावे लागणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका कारमध्ये अर्णव अभिषेक कौल, अखिलेश संजय पवार व ध्रुव नीलेश सोनवणे होते तर दुसऱ्या कारमध्ये एका नामांकित विल्डरचा मुलगा, सरकारी मक्तेदार तथा शैक्षणिक संस्था चालकाचा नातू होता, एक मुलगीही या मुलांसोबत होती, पोलिसांकडे देखील ही माहिती हाती आली असून, त्यात कितपत तथ्य आहे. यासाठी पोलिसांना मुळाशी जावे लागणार आहे.
अपघातानंतर मक्तेदार तथा शैक्षणिक संस्थाचालकही घटनास्थळी दाखल झाले होते. सर्वच श्रीमंतांची मुले असून, त्यांनी महागड्या अमली पदार्थाचे सेवन केले होते की नाही हेदेखील समोर आणणे एक आव्हान आहे
या गुन्ह्यात पोलिसांकडून तपासात आता तांत्रिक पद्धतीचाही अवलंब केला जात आहे. आरोपी आणि त्यांच्या मित्रांनी वाहनाची शर्यत लावल्यानेच हा अपघात घडला असल्याची शक्यता असून त्याबाबत सीसीटीव्ही फुटेजेची तपासणी करून सत्य काय आहे? याची चौकशी केली जात आहे. संस्थेत आरोपींच्या वाहनासोबत एक लाल रंगाची स्कोडा कार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कार कोणाची आहे? त्यात कोण होते? हे सारेच प्रश्न पुढे येऊ लागले आहेत.