जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२३ । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) विरोधात सर्व विरोधक मुंबईत एकवटले असून यावरून केंद्रीय समाकल्याण मंत्री ना. रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीच्या नेत्यांवर टोला लगावला आहे. विरोधकांनी मुंबईची हवा खावी, समुद्र पहावा आणि पंतप्रधानपदाचा एखादा उमेदवार निश्चित करावा; असा टोला, ना. आठवले यांनी लगावला आहे.
मुंबईत आज होणाऱ्या बैठकीवर बोलताना रामदास आठवले यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात किती पक्ष वाढवायचे तेवढे विरोधकांनी वाढवावेत. रिपाइं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी असणार असल्याचे ठाम मत त्यांनी यावेळी मांडले.
इंदू मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक यासह असंख्य कामे एनडीए सरकारने केली आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही दंड थोपटले तरी २०२४ मध्ये पुन्हा केंद्रात आमची सत्ता येऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असा दावाही रामदास आठवले यांनी केलाय.