---Advertisement---
बातम्या

Ram Setu Trailer : अक्षयच्या ‘राम सेतू’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, कधी होणार थिएटरमध्ये रिलीज?

---Advertisement---

अॅक्शन, अ‍ॅडव्हेंचर आणि सस्पेन्समधून जाणारा राम सेतूचा प्रवास पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अक्षय कुमारच्या राम सेतू या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. दरम्यान, अक्षय कुमारचा रिलीज झालेला रक्षाबंधन हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकला नाहीये. आता राम सेतू बाॅक्स ऑफिसवर काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज (Release) होणार आहे. Ram Setu Trailer Release

Ram Setu Trailer Release 1 jpg webp

या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात अक्षय एका पुरातत्त्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे जो राम सेतू खरा आहे की काल्पनिक आहे याची चाचपणी करत आहे. अ‍ॅक्शन आणि इमोशनसोबतच कथाही चित्रपटात पाहायला मिळते. अक्षय कुमारनेही या चित्रपटाचा ट्रेलर त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. राम सेतू यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच २५ ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे.

---Advertisement---
Ram Setu | Official Trailer | Hindi | Akshay Kumar | Only in Theatres 25th Oct 2022

दरम्यान, राम सेतूच्या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकूणच, निर्माते आणि चाहत्यांना अक्षयच्या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर अक्षयचा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये किती धमाका करतो, हे दिवाळीच्या मुहूर्तावर लवकरच कळेल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---