⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | रक्षाबंधन : सावद्याच्या भगिनींनी सीमेवरील सैनिकांना पाठवल्या राख्या!

रक्षाबंधन : सावद्याच्या भगिनींनी सीमेवरील सैनिकांना पाठवल्या राख्या!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! काल गुरुवारी हा सण उत्साहात साजरा झाला. सावदा येथील लिंगायत कोष्टी समाज महिला मंडळाच्या भगिनींनी हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. म्हणजे, सीमेवरील सैनिकांना राखी पाठवल्या. विशेष म्हणजे, त्या राख्या जवानांना काल गुरुवारी रक्षाबंधनाच्या दिवशीच मिळाल्या. दरम्यान, जवानांनी हातावर बांधून राखी आनंद व्यक्त केला तसेच बहिणींबद्दल भावना व्यक्त केल्या.

सावदा येथील लिंगायत कोष्टी समाज महिला मंडळातील स्वाती अभिजित कोष्टी, नेहा संजय बन्नापुरे, नेत्रा गणेश कोष्टी, वैशाली राजेंद्र कोष्टी, लता सुभाष कोष्टी, सुनीता सुरेश कोष्टी, उर्मिला संजय गरडे, मनीषा सुधाकर कोष्टी, वैशाली सतीश नारळे, अपेक्षा योगेश कोष्टी, योगिता चंद्रकांत कोष्टी, रुपाली विकास बावणे, ज्योती प्रशांत सरोदे यासह इतर महिलांनी गावावरुन देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांना राखी पाठवल्या होत्या. विशेष म्हणजे, बहिनीने पाठविलेली राखी ही रक्षाबंधनच्याच दिवशी काश्मीर येथे कार्यरत असलेले जवान जगदीश सरोदे व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली.

दरम्यान, जवानांनी राखी हातावर बांधून त्यांनी बहिणीचे आभार मानले. तसेच गेल्या अनेक वर्षाच्या कारर्किर्दीत पहिल्यांदाच आपल्या गावावरुन राखी आली आणि रक्षाबंधन हा सण साजरा करता आला. असे त्यांनी गहिवरुन सांगितले. ‘आपण हाती घेतलेल्या छोट्या छोट्या उपक्रमातून देशाच्या सैनिकास आंनद मिळाला असे उपक्रम सुरु राहावेत.’ असे मत गणेश कोष्टी यांनी व्यक्त केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह