शुक्रवार, डिसेंबर 1, 2023

खडसे आडनावामुळे मला डावललं जात असेल तर चुकीचं.. ; खा.रक्षा खडसे नेमकं काय म्हणाल्या..

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२३ । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आतापासून कंबर कसली असून मात्र, अशात रावेर लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आलाय. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे अद्यापही भाजपात आहेत. अशात आता निवडणुकीच्या तोंडावर त्या पक्षांतर करतील अशा चर्चा सुरू आहेत. या चर्चांवरून पत्रकारांशी संवाद साधताना रक्षा खडसे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. रक्षा खडसे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

नेमकं काय म्हणाल्या रक्षा खडसे?
“मी कोणत्या पक्षात जावं आणि कोणत्या नाही यावरून माझ्यावर कोणीही दबाव आनू शकत नाही. एकनाथ खडसेंचे विचार सध्या भाजपशी जुळत नसले तरी माझे विचार जुळतात. त्यामुळेच मी भाजपची खासदार आहे असं खा. रक्षा खडसे म्हणाल्या. “आम्ही एकाच कुटुंबातील असलो तरी आमचे विचार वेगळे आहेत. त्यांचे विचार वेगळे असल्याने ते त्या पक्षात आहेत आणि माझे विचार वेगळे असल्याने मी या पक्षात आहे. मात्र खडसे अडनाव माझ्या पाठी असल्याने मला डावललं जात असेल तर हे चुकीचं आहे, अशी नाराजी व्यक्त केली.

मी एकनाथ खडसेंची सून आहे फक्त यामुळे मी मोठी झालेले नाही. मी स्वत:ची ओळख माझ्या कामातून निर्माण केलीये. माझ्यावर आरोप केला जातोय की मी पक्षांतर करणार. पण मी ठामपणे सांगते की, माझे आणि त्यांचे विचार वेगळे आहेत. माझा पक्ष वेगळा आहे आणि मी भाजपमध्येच आहे.” असं रक्षा खडसेंनी म्हटलं.