रेल्वेच्या पुढे खासदारांची देखील चालेना, खा.रक्षा खडसेंच्या हवेत गप्पा
जळगाव लाईव्ह न्युज | ३ जुन २०२२ | जळगाव जिल्ह्यातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे भुसावळ मुंबई पॅसेंजर व भुसावळ नाशिक देवळाली शटल सुरू नसल्याने हाल होत आहेत. याबाबत केंद्र शासनाला आम्ही कित्येकदा पत्र दिले आहेत लवकरच या दोन्ही गाड्या सुरू होतील मात्र त्याची तारीख सांगू शकत नाही अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यायाने भारतीय जनता पक्षाच्या सरकारला केंद्र मध्ये आठ वर्ष पूर्ण झाली आहेत या आठ वर्षात केंद्र सरकारने कशाप्रकारे संपूर्ण देशाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले आहेत याची माहिती देण्यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विविध योजनांची माहिती दिली. ज्या मध्ये जनधन योजना उज्वला योजना अशा विविध योजनांचा समावेश होता याच बरोबर केंद्र सरकारने ज्या प्रकारे 370 कलम हटवला त्याबाबतची देखील त्यांनी माहिती दिली.
मात्र जळगाव जिल्ह्याच्या नागरीकांचा जिव्हाळ्याच्या रेल्वे गाड्या असलेल्या भुसावळ नाशिक देवळाली शटल व भुसावळ मुंबई पॅसेंजर या दोन गाड्या कधी सुरू होणार ? असा प्रश्न विचारला असता. त्यांनी उत्तर दिले की, गेल्या अडीच वर्षापासून या गाड्या बंद आहेत. यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. आम्ही देखील या गाड्या सुरू व्हाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहोत. मात्र आम्हाला कित्येक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. नुकताच कोळशाचा तुटवडा जाणवल्याने रेल्वे प्रशासनाने कित्येक गाड्या रद्द केल्या होत्या याचप्रमाणे अनेक अडथळे या गाड्या सुरू होण्यास मध्ये येत आहेत मात्र लवकरच या गाड्या सुरू होतील याची मला आशा आहे तर दुसरीकडे नक्की कधी या गाड्या सुरू होणार याबद्दल खासदार रक्षा खडसे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की त्याची तारीख निश्चित करू शकत नाही मात्र नक्कीच लवकरात लवकर या गाड्या सुरू होतील