वाणिज्य

राकेश झुनझुनवालांनी ‘या’ शेअर्समधील हिस्सेदारी केली कमी, तुम्ही तर नाही केलाय खरेदी?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । गेल्या मागील काही सत्रात शेअर बाजारात मोठी घसरण झालेली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, शेअर बाजाराचा बिग बुल म्हटला जाणारा राकेश झुनझुनवाला सध्या अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. अनेक शेअर्स 25 ते 30 टक्क्यांनी घसरले आहेत. बीएसईवरील त्रैमासिक फाइलिंगनुसार, बिगबुलने डेल्टा कॉर्प, टायटन, एस्कॉर्ट, ल्युपिन आणि सेलमधील आपली हिस्सेदारी झुनझुनवालांनी विकले आहेत. झुनझुनवालांनी कोणत्या शेअर्समध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे ते जाणून घेऊयात..

डेल्टा कॉर्पोरेशन
या शेअरमधील बिगबुलची हिस्सेदारी 7.48 टक्क्यांवरून 3.36 टक्क्यांवर आली आहे. या स्टॉकमधून त्यांनी 75 लाख शेअर्स एकाच झटक्यात विकले आहेत. बीएसईच्या तिमाही फाइलिंग डेटावरून ही माहिती प्राप्त झाली आहे.

टायटन
राकेश झुनझुनवाला यांना टाटा समूहाच्या या शेअरच्या जोरावरच शेअर बाजारात ओळख मिळाली आहे. हा त्याचा आवडता स्टॉक आहे. टायटनचे 44 लाख शेअर्स विकून त्यांनी आपली हिस्सेदारी 5.05 टक्के कमी केली आहे. यापूर्वी त्यांचा वाटा ८ टक्के होता.

एस्कॉर्ट्स
त्याने या ऑटो स्टॉकमधील आपला सर्वात मोठा हिस्सा विकला आहे. बीएसईच्या तिमाही फाइलिंग डेटानुसार, त्याच्याकडे आता 1.38 टक्के शेअर्स आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे ESCORTS चे 7.42 टक्के शेअर्स होते.

सेल
झुनझुनवाला यांनीही या PSU स्टॉकमधील आपली हिस्सेदारी कमी केली आहे. यापूर्वी त्यांचा या शेअरमध्ये १.८ टक्के हिस्सा होता, तो आता १ पेक्षा कमी झाला आहे.

ल्युपिन
बिगबुलने या औषध कंपनीतील आपला हिस्सा 1.51 टक्क्यांवरून 1 टक्क्यांवर आणला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button