⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | राजकारण | राज्यसभा विशेष : राज्यसभेचा निवडणूक प्रक्रिये बाबत तुम्हाला या गोष्टी ज्ञात आहेत का?

राज्यसभा विशेष : राज्यसभेचा निवडणूक प्रक्रिये बाबत तुम्हाला या गोष्टी ज्ञात आहेत का?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | राज्यसभा विशेष । देशासह संपूर्ण महाराष्ट्र मध्ये राज्यसभेच्या निवडणुकीच वार वाहत आहे. राज्यसभेत जाण्यासाठी प्रत्येक पक्षातून कोणी ना कोणी उत्सुक असतं आणि आपल्या पक्षाचा दबदबा राज्यसभेत तयार व्हावा यासाठी सर्व पक्षांकडून जय्यत तयारी करण्यात येते. कोणतही बिल पास करण्यासाठी राज्यसभा महत्त्वाची असल्याने राज्यसभेमध्ये स्वतःचे वर्चस्व असण अतिशय महत्त्वाचं म्हटलं जातं. दर दोन वर्षांनी होणारी राज्यसभेची निवडणूक आता पुन्हा होऊ घातली आहे. महाराष्ट्रातून संजय राऊत, संभाजी राजे, पी चिदंबरम यासारख्या मातब्बर नेते निवृत्त झाल्याने आता राज्यसभेची निविडणुक पुन्हा होणार आहे.

राज्यसभे विषयी

राज्यसभेला अप्पर हाऊस म्हणजेच वरिष्ठ सभागृह म्हटल जात. स्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणुकीनंतर लोकसभे बरोबरच आणखी एक सभागृह असाव अशी संकल्पना मांडण्यात आली. वरिष्ठ सभागृह असं राज्यसभेला संबोधण्यात येतं. राज्यसभेच्या तुलनेत लोकसभेचे अधिकार जास्त असतात मात्र राज्यसभेला ही लोकसभेचे इतकेच महत्त्व असते.करणं याठिकणी मागच्या दाराने जाता येत.

राज्यसभेत जास्तीत जास्त २५० जागा असु शकतात त्यापैकी 12 सदस्य राष्ट्रपती निवडतात. 236 सदस्य देशातील सर्व राज्यातून येतात. दोन सदस्य हे केंद्रशासित प्रदेशातून येतात. राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले उमेदवार प्रामुख्याने कला, विज्ञान, सामाजिक कार्य अश्या क्षेत्रांचे निगडित असतात. विश्‍वविक्रमी सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा यांना राज्यसभेत अशाच प्रकारे खासदारकी मिळाली होती.

निवड प्रक्रिया

भारतीय संविधानातील कलम 84 नुसार भारताचा नागरिक असलेला कोणीही व्यक्ती ज्याने वयाची ३० वर्षे पूर्ण केली आहेत. तो राज्यसभेवर खासदार म्हणून जाऊ शकतो. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 19 जागा आहेत. उत्तर प्रदेशात 31 आहेत. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, मेघालय, गोवा, मिझोराम, सिक्किम, त्रिपुरा यांच्यासारख्या लहान राज्यांमध्ये प्रत्येकी १ जागा आहेत.

राज्यसभा निवडणुकीमध्ये विजयी व्हायचे असेल तर प्रत्येक का खासदाराला ठरावीक मतं मिळणं अतिशय गरजेचं असतं. या मतांची संख्या जागेच्या संख्येवर अवलंबून असते. महाराष्ट्रात 288 आमदार असताना राज्यसभेवर केवळ 19 जागा आहेत. उदाहरण अर्थ महाराष्ट्रात जर ६ जागांवर निवडणूक होणार असेल तर निवडणुकीसाठी ७ ही संख्या गृहीत धरण्यात येते म्हणजेच 288 खासदारांची मत सात जागांसाठी भागली जातात.यामुळेजर एखाद्या उमेदवाराला राज्यसभेवर जायचं असेल तर त्याला 42 मतांची आवश्यकता असते. अशाप्रकारे महाराष्ट्रातून राज्यसभेच्या जागेवर खासदार निवडले जातात.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह