⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 27, 2024
Home | जळगाव जिल्हा | लाडकी बहीण योजनेमुळे महिला सक्षम होताय; आमदार राजूमामा भोळे

लाडकी बहीण योजनेमुळे महिला सक्षम होताय; आमदार राजूमामा भोळे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महानगरपालिकेत आ. राजूमामा भोळे यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा आढावा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२४ । जळगाव महानगरपालिका येथे आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या योजनेसंदर्भात अंगणवाडी सेविका यांची आढावा बैठक पार पडली. लाडकी बहीण योजनेमुळे महिला सक्षम होत असून त्यामुळे परिवार सक्षम पर्यायाने समाज व देश सक्षम होत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज न केलेल्या बहिणींनी देखील तत्काळ अंगणवाडी सेविकांकडे जाऊन अर्ज भरावा. म्हणजे त्यांना लाभ मिळेल, असे आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले.

महानगरपालिका येथे दुसऱ्या मजल्यावर “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या योजनेसंदर्भात दि. २६ रोजी बैठक उत्साहात पार पडली. यावेळी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त निर्मला गायकवाड, गणेश चाटे, सहायक आयुक्त अश्विनी गायकवाड, सुमित जाधव, महिला व बालकल्याण अधिकारी गायत्री पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. अंगणवाडी ताईंनी त्यांना आलेल्या विविध अनुभवांची माहिती दिली.

तसेच, या योजनेमुळे महिलांना आर्थिक हातभार लागत असल्याने त्यांनी राज्य सरकारचे आभार मानल्याचेही अनुभव अंगणवाडी सेविकांनी सांगितले.बैठकीत आ. राजूमामा भोळे यांनी येणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात जाणून घेतले. तसेच, योजनेसाठी अर्ज करणाऱ्या बहिणींच्या अर्जावर लवकर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी मनपा अधिकाऱ्यांनीदेखील समस्या जाणून घेऊन जर प्रक्रियेत काही त्रुटी असतील तर लवकरच दूर केल्या जातील असे आश्वासित केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.