जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील राजपूत समाजाचे युवा नेते डॉ. दीपकसिंग विजयसिंग राजपूत यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहयांची नवी दिल्ली येथील शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ. राजपूत यांनी मंत्री महोदयांचा गणपती बाप्पाची पितळेची मूर्ती आणि पारंपारिक शाल देऊन सन्मान केला.या भेटीत महाराष्ट्रातील राजपूत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली.

यामध्ये अमरावती विमानतळाला भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाचा विशेष उल्लेख झाला. तसेच, वर्ष २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राजपूत समाज मेळाव्यात केंद्रीय संरक्षन मंत्री राजनाथ सिंह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,(तत्कालीन उपमुख्यमंत्री) आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे(तत्कालीन मुख्यमंत्री) यांच्या उपस्थितीत राजपूत समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या.
मात्र, डॉ. राजपूत यांनी नमूद केले की, आजपर्यंत फक्त एकच मागणी पूर्ण झाली असून, उर्वरित मागण्या महाराष्ट्र सरकारने पूर्ण केलेल्या नाहीत.या सर्व मुद्द्यांचे निवेदन डॉ. राजपूत यांनी मंत्री महोदयांना प्रत्यक्ष सादर केले.मंत्री महोदयांनी निवेदनातील सर्व मुद्दे बारकाईने वाचले आणि समजून घेतले. त्यांनी या विषयाची पडताळणी करून समाजाच्या मागण्यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.विशेष म्हणजे माननीय मंत्री महोदयांनी डॉ. राजपूत यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि भविष्यात जळगावला आल्यास तुमच्या घरी नक्की भेट देण्याचे वचन दिले. तसेच, डॉ. राजपूत यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, ज्यामुळे त्यांची आपुलकी आणि सौजन्यशीलता दिसून आली.
डॉ. दीपकसिंग राजपूत यांनी या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत म्हटले, “माननीय श्री राजनाथ सिंहजी यांच्याशी झालेली ही भेट राजपूत समाजाच्या मागण्यांसाठी महत्त्वाची ठरली. त्यांचे आश्वासन आणि समजूतदारपणा आम्हाला आशा देतो की, आमच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील.”ही भेट रक्षामंत्री श्री राजनाथ सिंह यांच्या जनसेवेच्या समर्पणाचे आणि राजपूत समाजाशी असलेल्या दृढ नात्याचे प्रतीक ठरली.