जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील ‘हे’ गाव ठरले १०० टक्के लसीकरण करणारे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ ।  मागील दिड वर्षापासून संपुर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणु संसर्गाने थैमान घातले असुन, या कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेकांची कुटुंब उद्धवस्थ झालीत. कोरोना संपुष्टात आणण्यासाठी युद्धपातळीवर लसीकरण सुरु आहे. दरम्यान, यावल तालुक्यातील राजोरा हे गाव कोवीड-१९  च्या पार्श्वभूमीवर १०० टक्के लसीकरण करणारे जळगाव जिल्ह्यातील पहीले गाव ठरले आहे.

दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजनाताई पाटील यांनी या ठीकाणी भेट दिली. त्यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी.जमादार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमन्त बऱ्हाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिप अध्यक्षांनी गावकऱ्यांचे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामांचे कौतूक केले.

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातुन अत्यंत वेगाने लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवुन उल्लेखनिय कार्य केले. यावल तालुक्यातील भालोद प्राथमिक आरोग्य केन्द्राअंतर्गत येणारे राजोरा उपकेन्द्राने गाव आणी परिसरात नागरीकांनी कोवीड लसीकरण मोहीमेत १०० टक्के लसीकरणाचे कार्य केले.

यात पहीले कोविडशिल्ड लसीकरण कार्यक्रम ८ एप्रिल २०२१ ला १८ ते ४४ वर्षाच्या वयोगटातील १९९, २३ एप्रिलला ४५ ते ५९ वर्ष वयोगटाच्या १८४ नागरीकांना, त्याचप्रमाणे ६० वर्ष वयोगटातील २०२ जणांना तर गरोदरमातांना १० ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत, असे सर्व वयोगटातील ५८५ पैक्की ५८५ नागरीकांनी लसीकरण घेतले असुन ८९५ लसीकरण डोस देण्यात आले. तर १५ ऑगस्टला राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहीमेत दुसरे लसीकरण ५५० नागरीकांनी घेतले. लसीकरणच्या राष्ट्रीय आरोग्य मोहीमेत उत्कृष्ट कार्य करणारे राजोरा हे जळगाव जिल्ह्यातील पहीले गाव ठरले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button