भुसावळच्या नगराध्यक्ष पदासाठी रजनी सावकारे यांची उमेदवारी दाखल

नोव्हेंबर 15, 2025 4:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे रिंगणात असून त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

Ranjani Savkare

नगराध्यक्षपदांवर आपल्या कुटुंबातील व्यक्तींना संधी देण्याच्या सावध हालचाली भाजप नेते मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण यांनी काही दिवसांपासून सुरू केल्या होत्या. त्या संदर्भात इतके दिवस जोरदार चर्चा सुरू असताना संबंधित नेत्यांनी कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आल्यावर आता तिघांनी हळूहळू आपले पत्ते ओपन करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे.

Advertisements

मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी संजय सावकारे यांनी भाजपतर्फे भुसावळ पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. जामनेरमध्येही यंदा नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला राखीव निघाले आहे. त्यामुळे त्या जागी आपल्या सौभाग्यवती साधना महाजन यांची वर्णी लावण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

Advertisements

चाळीसगाव शहरातही यंदा नगराध्यक्षपद खुल्या जागेसाठी आहे. अर्थातच, त्या जागी आपल्या सौभाग्यवती प्रतिभा चव्हाण यांची वर्णी लावण्यासाठी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी हालचाली वाढविल्याची चर्चा आहे. माझ्या घरातील कोणताच सदस्य सार्वजनिक निवडणुकीत उभा राहणार नाही, असे आमदार चव्हाण यांनी यापूर्वीच जाहीर केल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी प्रतिभा चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जाते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now