जळगाव जिल्हा

राजेशसिंह चंदेल यांची चाळीसगावच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्याच्या गृह विभागाने नूतन १२ उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले असून यामध्ये चाळीसगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदी पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक राजेशसिंह अर्जुनसिंग चंदेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चाळीसगाव नियुक्ती होण्यापुर्वी ते पुणे, मुंबई येथे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त म्हणून कार्यरत होते. राजेशसिंह चंदेल यांनी मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम केलेले आहे. मेहुणबारे येथे असतांना त्यांनी केलेल्या गुन्हे अन्वेषणाचे आणि पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल कायदा व सुव्यवस्थेचे वरिष्ठांकडून कौतुक झाले होते.

त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली त्यानंतर त्यांची संभाजीनगर जिल्ह्यातील चापानगर येथे बदली झाली. पुढे त्यांच्या कामगिरीची दखल घेवून त्यांना बीड येथे एलसीबीचा पदभार देण्यात आला. त्यानंतर ते पुन्हा जळगांव जिल्ह्यात आले नंतर त्यांनी मुक्ताईनगर, जळगांव एलसीबी आणि जामनेर येथे पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर त्यांची पदोन्नती झाली. आता ते पुन्हा जळगांव जिल्ह्यात आले असून चाळीसगांवचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून लवकरच पदभार स्विकारतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button