---Advertisement---
राष्ट्रीय निधन वार्ता वाणिज्य

भारताचे वॉरेन बफे उद्योगपती राकेश झुनझुनवाला यांचे निधन!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२२ । भारताच्या शेअर मार्केटमधील वॉरेन बफे, प्रसिद्ध उद्योगपती राकेश झुनझुनवाला यांचे शनिवारी निधन झाले. शेअर मार्केट जगतात ते बिग बुल नावाने प्रसिद्ध होते. त्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

rakesh junjunwala jpg webp

राकेश झुनझुनवाला गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना काही आठवड्यांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. राकेश झुनझुनवाला यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांनी ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांचं निधन झाल्याची माहिती दिली. झुनझुनवाला यांना किडनीचा आजार असल्याची माहिती समोर आली आहे.

---Advertisement---

भारतात करोडो शेअर मार्केट गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या अंदाजाकडे लक्ष लावून असायचे. शेअर मार्केटमध्ये कोणत्या शेअरवर पैसे लावण्याने फायदा होते याचं भाकित राकेश झुनझुनवाला करायचे. त्यांनी दिलेला सल्ला हा योग्य असायचा. नवख्या गुंतवणूकदारांना त्यांचा मोठा आधार वाटायचा.

झुनझुनवाला यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. गुंतवणूकदारांनी हळहळ व्यक्त केली आहे. ट्वीटरवर दिग्गजांपासून गुंतवणूकदारांपर्यंत सगळ्यांनी श्रद्घांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्रात शिवसंग्राम नेते विनायक मेटे आणि राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---