जळगाव जिल्ह्यात पावसाचे होणार कमबॅक; आगामी दोन दिवस मुसळधार

सप्टेंबर 14, 2025 6:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२५ । बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि मान्सून उत्तरेकडे सरकण्यामुळे पूर्व-मध्य भारतात मान्सूनची सक्रियता वाढली आहे. हे पावसाच्या प्रणालींना बळकटी देईल. ज्यामुळे आगामी दोन दिवस जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यासाठी हवामान विभागाकडून १५ सप्टेंबर दरम्यान ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

RN14sep

आगामी तीन दोन केवळ पाऊसच नाही, तर ३० ते ४० किमी वेगाने सोसाट्याचे वारे आणि विजांचा कडकडाट आणि ढगाच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यानं या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

गणपती विसर्जन नंतर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. दुसरीकडे पावसाने विश्रांती घेतल्यानं तापमानात वाढ झाली होती. तापमानात ३ ते ५ अंशाची वाढ होऊन, मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला होता. शुक्रवारपासूनच मात्र वातावरणात बदल झालेला दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे तापमानात ३ अंशाची घट झाली होती.

मात्र आता जळगाव जिल्ह्यात आगामी दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याकडून जिल्ह्याला आगामी दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत ढगाळ वातावरण, तापमान २४ ते ३३ डिग्री सेल्सीयस तर आर्द्रता ६६ ते ८४ टक्के राहील.

जिल्ह्यातील आगामी चार दिवसाचा हवामान अंदाज

१४ सप्टेंबर : ३० ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पाऊस (यलो अलर्ट)
१५ सप्टेंबर : ३० ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पाऊस (यलो अलर्ट)
१६ सप्टेंबर : ढगाळ वातावरण, मध्यम स्वरुपाचा पाऊस
१७ सप्टेंबर : ढगाळ वातावरण, मध्यम स्वरुपाचा पाऊस

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now