---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा ; शेती पिकांचे मोठे नुकसान

garpith in chalisagon
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२१ । जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाचा शेतीतील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आधीच कर्जाच्या बोजाखाली असलेल्या शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.

garpith in chalisagon

जिल्ह्यातील आज दुपारी वातावरणात बदल झाला. त्यानंतर हळुहळू आकाशात ढग जमा झाले. सायंकाळी जिल्ह्यात विविध ठिकाणी पाचवाजेदरम्यान विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला, तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी आल्या. चाळीसगाव मध्ये वादळी पावसासह गारपीठ झाली. यामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. जळगाव शहरातही संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पाचोरा, एरंडोल, भुसावळ, वरणगाव आदि भागात पावसाने हजेरी लावली आहे.

---Advertisement---

दरम्यान, उन्हाळ्याच्या तोंडावर अचानक पाऊस आल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.  या अवकाळी पावसाने विशेष करुन ज्वारी, गहू, हरभरा अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी चिंतेत पडला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, ज्वारी कापून ठेवली होती. त्यात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिक खराब होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---