⁠ 
शनिवार, जून 15, 2024

जळगावमध्ये भरदुपारी दाटला अंधार ; अनेक ठिकाणी गारपिटीसह मुसळधार पावसाची हजेरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२३ । राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून गारपीटसह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. आता हा अंदाज तंतोतंत खरा ठरताना दिसत आहे. जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यात गारपीटसह अवकाळी पावसाने अक्षरक्ष: झोपडून काढलं आहे. जळगावमध्ये भरदुपारी अंधार दाटला आहे. त्यामुळे संध्याकाळचे 7 तर वाजले नाहीत ना, असा प्रश्न अनेकांना पडला.

जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली तर काही ठिकाणी गारपीटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सध्या सुरु असलेल्या पावसामुळे नेमका उन्हाळा आहे कि पावसाळा? असाही प्रश्न पडत आहे.

जळगावसाठी पुढचे 72 तास महत्वाचे.. वाचा नेमकं काय आहे

जळगाव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी गारपीट व अवकाळी पाऊस झाला. यापूर्वी काल जिल्ह्यात अनेक भागात वादळी पावसाने तडाखा दिला होता. त्यांनतर आज देखील अनेक भागात गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. बुधवारी देखील जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती.

एकीकडे उन्हाळा सुरु असून त्यात अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. अवकाळीमुळे उन्हाळा पारा घसरला आहे. आज शुक्रवारी दुपारी अंधार दाटला आहे. त्यामुळे संध्याकाळचे 7 तर वाजले नाहीत ना, असा प्रश्न अनेकांना पडला. तापमानाचा पारा देखील चांगलाच घसरला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्याला 30 एप्रिल पर्यंत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.