जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । सण-उत्सवांची भरगच्च रेलचेल असलेल्या श्रावणात पावसाची आभाळामाया कायम राहणार आहे. पुढील चार दिवस स्वातंत्र्यदिन, पारशी नववर्ष दिन आणि गाेपाळकाल्यापर्यंत जिल्ह्यात पावसाचा जाेर कायम असेल. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पाेळा, हरतालिका आणि गणेश चतुर्थीला मात्र पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने पुढील पंधरवड्याचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. सद्यस्थितीत दक्षिण गुजरात ते केरळपर्यंत द्राेणीय स्थिती निर्माण झाल्याने राज्यात पावसाचा जाेर वाढला आहे. विशेष उत्तर महाराष्ट्रासह काेकण आणि विदर्भात १६ अाॅगस्टपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळाधार पाऊस हाेईल. १७ ऑगस्टला उघडीप तर १८ अाॅगस्टला पुन्हा पाऊस हाेईल अशी शक्यता ऑक्युवेदर या खासगी संस्थेने वर्तवली आहे. २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान पाऊस तर २६ ऑगस्ट राेजी पाेळ्याला वातावरण ढगाळ असेल. २७ ऑगस्टपासून पुन्हा पावसाची शक्यता आहे. ३० ऑगस्ट राेजी हरतालिका आणि ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थीला वातावरण काेरडे असेल. १ सप्टेंबर राेजी ऋषीपंचमी असून २ सप्टेंबरपासून पुन्हा पावसाचा जाेर वाढेल. तसेच पंधरवड्यात सरासरी ५० मिलिमिटर पावसाची हाेण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, यंदा सण-उत्सवाच्या काळात पावसाची आभाळामाया असल्याने बळीराजा सुखावला आहे.